lasalgaon fire 3.jpg 
नाशिक

VIDEO : लासलगाव बसस्थानकावर विवाहितेला जाळून मारण्याचा प्रयत्न..धक्कादायक प्रकार!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : हिंगणघाट येथील एका तरुण प्राध्यापिकेला जाळून मारण्याच्या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत असतानाच लासलगाव बसस्थानकावर एका विवाहितेवर पेट्रोल टाकून पेटवून देत जाळून मारण्याचा प्रयत्न करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

असा घडला प्रकार...
लासलगाव बसस्थानकावर पिंपळगाव नजीक येथील एक विवाहित महिला रसवंतीगृहाजवळ बसची वाट पाहत थांबली होती. यावेळी अचानक चार संशयितांनी बसस्थानकात येत महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देत जाळून मारण्याचा प्रयत्न केला. त्यात ती पन्नास टक्के भाजली असून लासलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर तिला नाशिक येथे हलविण्यात आले. घटना घडली तेव्हा बसस्थानकाच्या आवारात धावपळ झाली

महिलेची प्रकृती गंभीर 
घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले. सदर घटना पूर्ववैमनस्यातून घडल्याची चर्चा असून बसस्थानकातील सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांनी चार अज्ञात संशयितांचा शोध सुरू केला आहे. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तत्काळ बसस्थानकावर धाव घेत सीसीटीव्हीच्या फूटेजच्या आधारे तपासाला गती दिली असून चारही संशयितांच्या शोध सुरू करण्यात आला आहे. हा प्रकार हा पूर्ववैमनस्यातून घडल्याची चर्चा सुरू असून नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.", 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: राष्ट्रवादी काँग्रेसचा चिंतन मेळावा सुरू असताना कर्मचारी ४० मिनिटं टॉयलेटमध्ये अडकला, नेमकं काय घडलं?

Sanjay Raut : संजय राऊतांच्या निवासस्थानी बंदोबस्त वाढवला, शिंदे गटाच्या आमदाराने दिलेल्या धमकीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर...

माथेरानसारखी 'मिनी ट्रेन' पाटणमध्ये सुरू होणार; पालकमंत्री शंभूराज देसाईंचा महत्त्वाचा प्रस्ताव, पर्यटन विकासासाठी 70 कोटी मंजूर

Latest Marathi News Live Update : गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला समर्थकांनी केला दुग्धाभिषेक

Shardiya Navratri 2025 Zodiac Predictions: शारदीय नवरात्रीत 'या' राशींचा सुरू होईल गोल्डन टाइम, होतील मालामाला

SCROLL FOR NEXT